Sunday, October 26, 2025
HomeCulturalशेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ - हंसराज अहीर

शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ – हंसराज अहीर

Farming and cow breeding are the roots of Indian culture – Hansraj Ahir

चंद्रपूर : गोवर्धन पूजा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे आणि शेतकऱ्यांच्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. भारताची खरी ओळख ही शेती, गाई-गुरे आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात आहे. या पूजेद्वारे आपण निसर्गाबद्दल, आपल्या मातीतल्या देवतांबद्दल आणि गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी केले. Farming and cow breeding are the roots of Indian culture

                दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

                या कार्यक्रमाला चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा शहर अध्यक्षा छबू वैरागडे, माजी महापौर अनिल फुलझेले, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, महामंत्री रवी गुरुनुले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, प्रदीप किरणे, रवी जोगी, सुभाष अदमाने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, भाजप नेते प्रकाश देवतळे, पुनम तिवारी, गौतम यादव, सुदामा यादव, राजु येले, नामदेव डाहुले, माजी सेविका वनिता डुकरे, पुष्पा उराडे, शीतल गुरुनुले, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मयुर भोकरे, प्रविण गिलबिले, राम हरणे, अमित करपे, पराग मलोडे, ईश्वर वाघमारे, अंजी मातंगी, कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेचे उमेश साळुंखे, जनार्धन भुजाडे, राजू सांळुखे, राजकुमार भगाडे, सागर वाजेकर, श्रावण गदई उपस्थित होते. Govardhan Puja Festival organized by Bharatiya Janata Party and Kanifnath Multipurpose Institute

                यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आपला देश शेतकÚयांचा देश आहे. शेतकरी मेहनत करतो म्हणून आपल्याला अन्न मिळते, आपली संस्कृती टिकून राहते. गोवर्धन पूजा म्हणजे त्या श्रमाला, त्या निसर्गाला, त्या देवत्वाला वंदन करण्याचा दिवस आहे. आपण आधुनिक युगात जगत आहोत, त्यामुळे संस्कृती टिकविण्याचे मोठे आव्हान आपल्या पुढे आहे. आपल्या संस्कृतीशी असलेली ही नाळ कायम ठेवणे आवश्यक आहे.

                आज भारतीय जनता पार्टी समाजकारण, संस्कृती रक्षण आणि समाज एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. अशा सण-उत्सवांतून समाजात एकोपा, सौहार्द आणि राष्ट्रभावनेचा प्रकाश पसरतो. आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत, कारण याच परंपरा आपल्याला एकत्र बांधतात, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

                दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण असून हा प्रकाश केवळ दिव्यांचा नसून विचारांचा असावा. आपण सर्वजण मिळून समाजातील अंधार, विषमता आणि अन्याय दूर करावा, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular