Thursday, April 2, 2026
HomePoliceफिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह संपन्न

फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह संपन्न

Fit India Cycling Drive concludes

“आधा घंटा रोज, फिटनेस का डोज.         Say No To Drug Dose” या संदेशासह जनजागृती

चंद्रपूर :- भारत सरकारच्या क्रीडा विभाग व “फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजता फिट इंडिया सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले. Fit India Cycling Drive

पटेल हायस्कूल समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुर्गापूर रोड–पद्मापूर गेट मार्गे पोलीस सभागृह, तुकूम येथे या सायकलथॉनचा समारोप झाला.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश “Say No To Drug Dose – आधा घंटा रोज, फिटनेस का डोस” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे व नागरिकांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता.

सदर सायकलथॉनला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शन लाभले. तर अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम संपन्न झाला. श्री. कातकडे यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकलथॉनची सुरुवात केली आणि स्वतःही यात सहभागी झाले.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात डॉ. मंगेश गुलवाडे, व्यावसायिक श्री. अनिल टह्लयानी, श्री. संदीप बच्चुवार, श्री. शाकीर उकाणी, श्री. आबीद भाई, श्री. अक्षय राऊत, श्री. धर्मा गावंडे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. तसेच गो ग्रीन सायकल ग्रुप Go Green Cycle Group चे सदस्य, जिल्हा परिषदेचे अधिकारी श्री. फटींग, श्री. विशाल देशमुख, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार, श्री. प्रविणकुमार पाटील, श्री. आसिफराजा शेख, श्री. निशिकांत रामटेके, श्री. संदीप एकाडे, रा.पो.नि. श्री. किसन नवघरे, रा.पो.उपनि. श्री. रासेकर, सपोनि श्री. हिमांशु उगले, श्री. देवराव नरोटे, श्री. अश्विनी वाकडे, पो.उपनि. संदीप बच्छीरे, श्री. चंद्रकांत पेद्दीलवार यांच्यासह चंद्रपूर शहर, रामनगर व दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular