Shri Kasaudhan Vaishya Samaj organizes religious program on July 28
नागपूर : श्री कसौधन वैश्य समाजाच्या वतीने सोमवार, दिनांक २८ जुलै रोजी हनुमान नगर क्रीडा चौक येथील संत रविदास सांस्कृतिक सभागृहात एक भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Shri Kasaudhan Vaishya Samaj organizes religious program
या कार्यक्रमात देशभरातून समाजाचे विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या साक्षीने १० ते १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, जे समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक ठरणार आहेत.
कार्यक्रमास खादी उद्योगाचे श्री. प्रकाश गुप्ता, श्री. वीरेंद्र गुप्ता (इंदूर), संतोष गुप्ता, आशिष गुप्ता, आशाताई गुप्ता (इंदूर), शिवकुमार गुप्ता, डॉ. मोहन गुप्ता, निलेश गुप्ता, तसेच आशिष गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. राजेश भाऊ गुप्ता यांनी केले आहे.