Friday, October 23, 2026
HomeCultural‘भाऊचा दांडिया’ची परंपरा अखंड सुरू राहणार!

‘भाऊचा दांडिया’ची परंपरा अखंड सुरू राहणार!

चंद्रपूर :- द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे आयोजित ‘भाऊचा दांडिया २०२६’ या भव्य महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच अतिशय दिमाखात व उत्साहात पार पडला. ‘Bhaucha Dandiya 2026’ prize distribution ceremony

महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट – विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा…….

या प्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक मनोगत व्यक्त केले. “चंद्रपूर जिल्ह्यात ‘भाऊचा दांडिया’ ही केवळ एक स्पर्धा नसून ही एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही परंपरा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहील. तसेच इतर सामाजिक व सर्व क्षेत्रांतील जनतेच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभी राहीन,” अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. त्यासोबतच, “चंद्रपूरकरांनी दिलेल्या अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा महोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणे शक्य झाले,” असे सांगत त्यांनी सर्व चंद्रपूरकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

या स्पर्धेतील मुख्य व सांघिक गटात आनंद यशवंत इंगोले आणि सुष्मिता सुशील मल्लेक यांनी चॅम्पियनचा किताब पटकावला. त्याचप्रमाणे मुख्य किताबांमध्ये ‘किंग’ म्हणून अनुराग घोरपडे तर ‘क्वीन’ म्हणून मनीषा सरकार यांची निवड करण्यात आली. युगल गटात आर्य प्रवीण कोहापरे व आदित्य अनिल राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर शर्वरी बनकर व आकाश मडावी यांनी द्वितीय आणि रोहण राजपूत व सोफी सदर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सोलो नृत्य स्पर्धेत मुलांच्या गटात धनंजय मेश्राम प्रथम, सुहास बौरिया द्वितीय व आर्य विटेकर तृतीय राहिले; तर मुलींच्या गटात दिव्याणी भरत मंदाडे हिने प्रथम, इशिका धनेश व्यास हिने द्वितीय व अमृता दादमल हिने तृतीय क्रमांक पटकावला. लहान मुलांच्या गटात दक्ष राजू दार्वे (प्रथम), कौशिक अतिश कुलमेथे (द्वितीय) व जियांशू प्रफुल वांधारे (तृतीय) यांनी बाजी मारली; तर लहान मुलींमध्ये आरोही गौतम मून (प्रथम), कियारा बेलन्स (द्वितीय) व आरिणी ढाकते (तृतीय) विजेत्या ठरल्या. ३५ वर्षांवरील गटात प्रिन्स रामटेके यांनी प्रथम, स्नेहा ढाकते यांनी द्वितीय व सविता भालचंद्र पंचालवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

विशेष पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट पोशाख श्रेणीत श्रेया सुनील असार विजेती ठरली. तसेच, ‘बेस्ट स्टॅमिना’ म्हणून तृषा रोशन उराडे आणि ‘बेस्ट अट्रॅक्शन ऑफ ग्राउंड’ म्हणून जतीन रामचंद्र धोटे व अनुष्का माणूसमारे यांना गौरविण्यात आले. संवाद प्रतिष्ठानतर्फे एक लाख रुपयांचे विशेष बक्षीस यावेळी देण्यात आले.

या संपूर्ण सोहळ्याने दांडिया महोत्सवाची सांगता अतिशय आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात झाली. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular