Saturday, April 18, 2026
HomeCrimeइलेक्ट्रीक पोल फसवणूक प्रकरणी तिघांना अटक:

इलेक्ट्रीक पोल फसवणूक प्रकरणी तिघांना अटक:

Three arrested in electric pole fraud case

चंद्रपूर :- नागभीड तालुक्यातील अनेक ठिकाणी नविन इलेक्ट्रीक लोखंडी पोल उभारणीच्या कामात फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नागभीड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ११४ लोखंडी पोल व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण २१,६५,१९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Electric pole fraud case

फिर्यादी विक्रमसिंग वृजेंद्रसिंग (वय ४२, रा. माजिगावाहन, जि. रिवा, मध्यप्रदेश) यांनी ५ जुलै रोजी नागभीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अशोका बिल्डकॉन लिमिटेड नाशिक कंपनीला नागभीड तालुक्यात मिंडाळा ते किटाळी मेंढा फिडर सेपरेशनअंतर्गत पोल उभारणी व वायरिंगचे काम मिळाले होते. या कामासाठी प्रकाश एंटरप्रायझेस, रिवा (म.प्र.) यांना कंत्राट देण्यात आले होते. Nagbhid Police Station

प्रकाश एंटरप्रायझेसचे मालक अजयकुमार बृजकिशोर मिश्रा यांना गडचिरोली डिपोमधून १९० नग ९ मीटर लांबीचे लोखंडी पोल देण्यात आले होते. मात्र त्यांनी यातील १२७ पोल, अंदाजे १२.९८ लाख रुपये किमतीचे, परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले.

या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात कलम ३१६ (२), ३१८ (४) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलिसांनी अजयकुमार बृजकिशोर मिश्रा, रा. रिवा (म.प्र.), गेंदलाल गुहाराम शाहू, रा. बिटाल (छत्तीसगड) व धनराज तोडेलाल सुर्यवंशी, ट्रेलर ट्रक चालक, रा. नागपूर या तीन आरोपींना अटक केली.

सदर कार्यवाही चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोहवा दीपक कोडापे, विनोद गायकवाड, पोअं भरत घोळवे, अवधुत खोब्रागडे, जय रोहणकर, विक्रम आत्राम यांचा सहभाग होता.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular