Start work on iron bridge at Ghugghus within 10 days
१० दिवसात घूग्घूस येथील लोखंडी पुलाचे काम सुरू करा – आमदार किशोर जोरगेवार यांचे निर्देश*
*जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*
चंद्रपूर :- घुग्घुस रेल्वे सायडिंग वरील मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या कामास येत्या १० दिवसांत सुरुवात करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. Start work on iron bridge at Ghugghus
सदर विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, वेकोलि वणी एरियाचे अभियंता जमगाडे, रेल्वे अभियंता राजूरकर, घुग्गुस नगरपरिषदचे दिनेश बावणे, आशिष मासिरकर, सोनल भरडकर, सन्नी खारकर, संजय भोंगळे, अनिल यादव, किरण पूरेली, राजूभाऊ जगताप, सक्कील राईन, दिनेश बोरपे, , संतोष नुन्ने, संजय तिवारी, मयूर कलवल आदींची उपस्थिती होती.
या पुलाच्या बंदमुळे सायडिंग कॉलनीतील नागरिकांना घुग्घुस शहरातील बाजारपेठेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वणी रोडवरील पुलाचे कामही अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
यावेळी बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, हा पूल घुग्घुसच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, कामगारांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची अधिक विलंब सहन केला जाणार नाही. १० दिवसात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या वतीने तातडीने हालचाली करण्याचे आश्वासन दिले. लवकरच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
