Friday, April 17, 2026
HomeAgricultureधान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

Paddy farmers will get bonus within 15 days

चंद्रपूर :- राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर बोनस मिळणार आहे. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांच्या आग्रही मागणीला अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या साचिव सिंगल मॅडम यांनी आश्वासन दिले आहे.

विधानसभेत हा विषय प्रभावीपणे मांडत आमदार श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते. यासंदर्भात दखल घेत राज्य सरकारने याबाबत २५ मार्च रोजी शासनादेश काढला होता, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव सिंगल मॅडम यांच्याकडे ठोस मागणी केली होती. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत सिंगल मॅडम यांनी येत्या १५ दिवसांत बोनस वितरित केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. Secretary of the Food and Civil Supplies Department gave assurance to the insistent demand of MLA Sudhir Mungantiwar

शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो, फक्त नोंदणी केली असेल तरीही २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत नोंदणीकृत धान उत्पादकांना हा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
यापूर्वीही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. शेतकऱ्यांप्रती त्यांची संवेदनशीलता आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची चिकाटी हीच त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख ठरली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular