Friday, April 17, 2026
HomeAgricultureजिल्हा परिषद सेसफंड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हा परिषद सेसफंड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Take advantage of Zilla Parishad Cess Fund Scheme

जिल्हा परिषद सेसफंड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ :- जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी दि.३१ मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने https://yavatmalyojana.com या संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती कळंब कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. Zilla Parishad Yavatmal Cess Fund Scheme

जिल्हा परिषद सेस फंड योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे, खत कीट खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देणे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी वन्य प्राण्यापासून संरक्षणास काटेरी कुंपण करण्याकरिता अर्थसहाय्य पुरविणे, ३ हेक्टर जमिन मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ३ एच.पी. विद्युत मोटार पंप खरेदीवर ७० टक्के अनुदान उपलब्ध करून देणे, ३ हेक्टर जमिन मर्यादा असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप खरेदीवर ७० टक्के अनुदान उपलब्ध करून देणे, ३ हेक्टर जमिन मर्यादा असलेल्या शेतकरी समूह गटास ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना मानव चलित टोकण यंत्र खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देणे, स्पायरल सेपरेटर खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देणे इत्यादी योजना राबविण्यात येत आहे.

याकरीता योजनेच्या अटी शर्तीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रासह https://yavatmalyojana.com या संकेतस्थळावर अर्ज दि. ३१ मे पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे पंचायत कळंब येथील कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular