Saturday, June 13, 2026
HomeNationalपुण्यतिथीनिमित्त स्व. राजीव गांधींना काँग्रेसच्या वतीने अभिवादन.

पुण्यतिथीनिमित्त स्व. राजीव गांधींना काँग्रेसच्या वतीने अभिवादन.

Congress salutes late Rajiv Gandhi on his death anniversary

चंद्रपूर :- भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे राजुरा तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

अंमली पदार्थांचे सेवन… प्रभावी उपाययोजना राबवा

यावेळी माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजीतसिंग संधु, साईनाथ बतकमवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, शंकर गोनेलवार, धनराज चिंचोलकर, अशोक राव, सय्यद साबिर, उमेश गोरे, संघपाल देठे यासह राजुरा तालुका आणि शहर काँग्रेससह काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular