Thursday, April 16, 2026
HomeEducationalविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्या

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्या

Focus on providing quality education to students

चंद्रपूर :- विजाभज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

श्री. वाकुलकर यांनी विभागातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील विजाभज आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, संस्थाचालक व कर्मचाऱ्यांची नुकतीच चंद्रपूर येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक संचालक आशा कवाडे उपस्थित होत्या. यावेळी श्री. वाकुलकर यांनी मुख्याध्यापक, संस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मान्यता संख्येनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, व डीसीपीस याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनुकंपाधारकांनी प्रस्तावातील त्रुटी दूर करुन 30 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular