Local Crime Branch raids gambling den
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने बल्लारपूर येथील पेपर मिल मागील वर्धा नदी काठावर जुगार अड्डयावर छापा मारीत जुगार खेळणाऱ्या 11 जुगारांना ताब्यात घेत 1,78,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. LCB Raids Gambling Den
दि. 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे आदेशाने पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना बल्लारशाह पेपर मीलच्या मागे, वर्धा नदीच्या काठावर निखील रणदिवे रा. बल्लारशाह हा इसम काही इसमांना सोबत घेऊन 52 ताश पत्याचा, कट पत्याचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाली.
यावरून ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सापळा रचुन छापा मारला असता, घटनास्थळावर चंद्रपूर, राजुरा, बल्लारशा येथे राहणारे एकुण 11 आरोपी इसम जुगार 52 ताश कट पत्ता गेम खेळत असतांना आढळून आले.
जुगाराचे डावावर व त्यांचे अंगझडतीत एकुण 1,78,300/ रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.
अकरा आरोपीतांस ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोस्टे बल्लारशाह येथे अप क 267/2025 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारशाह पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि गौरकार, सफौ. करकाडे, पो. हवा. सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, नितीन कुरेकार, पो.कॉ. प्रशांत नागोसे, शशांक बादमवार, प्रफुल गारघाटे यांनी केली.