Ramnagar police busted a gang preparing for robbery
चंद्रपूर :- इराई नदी जवळील छोटा कश्मीर, ठक्कर नगर भागात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक मोटर सायकलवर बसून हातात धारदार शस्त्रे घेऊन दरोडा, लूटमार करण्याच्या बेत आखून तयारीत असतांना रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकत 3 युवकांना अटक करीत त्यांचे जवळील 2 धारदार तलवार, 1 लोखंडी पट्टी, एक टेस्टर व 3 मोटर सायकल असा एकूण 2,31,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Ramnagar police arrested a gang preparing for robbery
रामनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील अधिकारी पथकासह रात्रो पेट्रोलिंग करीत असतांना, इरई नदी लगतच्या छोटा कश्मीर, ठक्कर कॉलनी भागात काही युवक धारदार शस्त्र घेऊन असल्याची गोपनीय माहिती पथकाला प्राप्त झाली,
पोलीस पथकाने त्याठिकाणी दुरून पाहणी केली, रात्रो 10:30 ते 11 वाजताची वेळ असल्यामुळे पोलीस पथकाने चंद्राच्या उजेळात पाहणी केली असता 3 मोटर सायकल वर 7 व्यक्ती हातात धारदार शस्त्रे घेऊन आढळून आली, दरम्यान गुन्हे शोध पथकाने छापा टाकत पकडण्याचा प्रयत्न केला असता रेहान शेख (19) रा. जटपुरा, इशांत कुंभारे (19) रा. अंचलेश्वर गेट व बाबुपेठ येथील 1 युवक यासह 1 विधिसंघर्ष बालक यांना पकडण्यात आले तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. Goods worth Rs 2.31 lakh seized including two sharp swords
तिघांची विचारपूस केली असता लूटमारीच्या उद्देशाने थांबल्याची कबुली दिली, त्यांची अंगझडती घेतली असता दोन धारदार तलवार, लोखंडी पट्टी, टेस्टर व 3 मोटर सायकल असा एकूण 2,31,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध रामनगर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, शरद कुडे, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, मनिषा मोरे, हिरालाल गुप्ता, प्रफुल पुष्पलवार, पंकज ठोंबरे, रविकुमार ढंगळे, संदिप कामडी, ब्ल्युटी साखरे यांनी केली.