Eliminate water shortage in Babupeth area
चंद्रपूर :- बाबुपेठ परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली करिता बाबुपेठ परिसरातील पाणीपुरवठा नियमित करून येथील जलसंकट दूर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. Eliminate water shortage in Babupeth area
शहरातील बाबुपेठ प्रभागात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळांमध्ये पाणी खूप कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेवर येत आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना खूप गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या काळात ही समस्या आणखी गंभीर होते, ज्यामुळे पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण होत आहे.
पाणीपुरवठा वाढवण्यासाठी किंवा नियमित करण्यासाठी काही पर्यायी उपाययोजना करून ती लवकरात लवकर अंमलात आणावी अशी मागणी भाजप कार्यकर्ते रूपेश पांडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त विपीन पालिवाल यांना केली आहे.
लवकरच यावर तोडगा काढून नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त पालिवाल यांनी दिले.
यावेळी अभिलाष दुबे, प्रफुल्ल डफ, अभिनेश इम्मडी, विनोद नळे, राहुल शुक्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
