41st Memorial Day Program of Barrister Rajabhau Khobragade
चंद्रपूर :- बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी भव्य जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे होते त्यांनी आपल्या संबोधनात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामगिरी केली आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक व राजकीय एकोपा निर्माण करत असल्याचे सांगितले. The need of the hour is to instill Social Equality and Constitutional Values in the Minds of the People
रुग्ण ताटकळत…, ॲम्बुलन्स ची संख्या वाढवा – मनसे
उपस्थित मान्यवरचा परिचय अशोक निमगडे यांनी केला तर इंजि.किशोर साबने यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव त्यांचा जन्मदिनाचे अवचित्य साधून आठवड्याभराचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची सामाजिक न्यायाची संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरित होती असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठाचे प्राध्यापक डॉ हरीश वानखेडे यांनी केले.
नागपूर येथील जेष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांनी सद्यस्थितीत भारतातील सामाजिक आणि राजकीय संस्कृती देशातील जनतेकरिता घातक असून पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
177 पानांची दारू दुकान परवाना घोटाळ्याची SIT कडे तक्रार
मंचावर अशोक टेंभरे, किशोर तेलतुमडे, विशाल अलोणे, पप्पू देशमुख, प्रा.अनिल डहाके, बुद्धप्रकाश वाघमारे, राजेश जनबंधू, चेतन उंदिरवाडे, हरिदास देवगडे, शाहीन शेख, ज्योती सहारे, अवतरसिंग गोथरा, धीरज शेडमाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 41st Memorial Day Program of Barrister Rajabhau Khobragade
स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत अक्षता ढाले ला यश
