Maha Aarti performed by 108 couples at 300-year-old Maha Shivlinga site
चंद्रपूर :- महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लालपेठ, भिवापूर वार्ड, येथील सुमारे ३०० वर्षे पुरातन व महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आज सकाळी १०८ दांपत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार सहपत्नीक उपस्थित होते. वेदमंत्रांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, Hansraj Ahir मनीष महाराज, भाजप नेते अशोक जीवतोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. Maha Aarti performed by 108 couples at 300-year-old Maha Shivlinga site
यावेळी MLA Kishor Jorgewar आमदार किशोरभाऊ जोरगेवार म्हणाले, महाशिवरात्री हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या महाशिवलिंग स्थळी रुद्राभिषेक करण्याचे भाग्य लाभणे ही आनंदाची बाब आहे. या ठिकाणचा आध्यात्मिक वारसा जपणे आणि भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
मागील श्रावण महिन्यात आपण या पवित्र शिवलिंग स्थळी भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या माध्यमातून अनेक वर्षे भक्तांच्या नजरेआड राहिलेल्या या जागृत आणि अतिशय प्राचीन शिवलिंगाची ओळख राज्यभर पोहोचविण्याचे कार्य घडले. या स्थळाला अपार आध्यात्मिक महत्त्व असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दिव्य आणि समाधानाचा अनुभव मिळतो. श्रावण महिन्यात आयोजित कार्यक्रमास अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवून विधीवत पूजा केली होती, ही या स्थानाच्या वाढत्या धार्मिक महत्त्वाची साक्ष आहे. Will accelerate the development of the site that adds to the religious glory of Chandrapur
चंद्रपूरच्या धार्मिक वैभवात भर घालणारे हे स्थान असून, याचा सर्वांगीण विकास करण्याचा आपण संकल्प केला आहे. भाविकांसाठी अधिक सोयी-सुविधा निर्माण करणे, परिसराचा विकास करणे आणि या पवित्र स्थळाचा आध्यात्मिक वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
महाशिवरात्री निमित्त आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महाशिवलिंग मंदिर सेवा समिती आणि मित्र संघ क्रीडा मंडळाच्या वतीने येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळच्या महाआरतीनंतर मनोकामना पूर्ती महारुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर विविध भाषिक भजन मंडळांच्या भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्या महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.