Tuesday, May 26, 2026
HomeCrimeप्राणी क्रूरता रोखा ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

प्राणी क्रूरता रोखा ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

Meeting of the District-Level Committee for the Prevention of Cruelty to Animals

चंद्रपूर :- पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी राज्यात प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा 1960 अस्तित्वात आहे. या कायद्याचे काटेकोरपणे पालन करून शासनाने निर्धारीत केलेल्या अटी व शर्तीची ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत District Collector Vasumana Pant यांनी दिले. Strictly Adhere to the Prevention of Cruelty to Animals Act मोबाईल वर एक्स्ट्रीम अलर्ट… विदर्भात अतितीव्र उष्णतेचा इशारा……

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी (दि.25) आयोजित जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिहर वरठी, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, गणेश येळणे, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार आदी उपस्थित होते. Meeting of the District-Level Committee for the Prevention of Cruelty to Animals

आगामी बकर ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, 21 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल व अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. रुग्णांच्या सेवेसाठी खासदार धानोरकरांची धडक, व्यवस्था सुधारली…….

तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करणे, अवैध जनावर वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करणे, संयुक्त भरारी पथके स्थापन करणे, सीमावर्ती भागात संयुक्त तपासणी चौक्या उभारणे, डायल 112 हेल्पलाईनवर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे याबाबतही त्यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले. याशिवाय, संघटित पद्धतीने होणाऱ्या गोतस्करी प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून प्राणी क्रूरता प्रतिबंधक तरतुदींचे काटेकोर पालन करावे. जिल्हाभरात आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यती दरम्यान जिल्हाधिका-यांची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.

सुरवातीला उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी गठित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची उद्दिष्टे व कार्य तसेच समितीच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular