Friday, April 17, 2026
HomePoliticalनगरपरिषदेला १५ दिवसांचा अल्टिमेटम : आप चा एल्गार

नगरपरिषदेला १५ दिवसांचा अल्टिमेटम : आप चा एल्गार

15-day ultimatum to the Ballarpur municipal council

चंद्रपूर :- बल्लारपूर शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून आम आदमी पार्टी बल्लारपूर शाखेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांच्या पाठिंब्यासह निवेदन सादर करत, प्रलंबित कामांसाठी १५ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. ultimatum to the Ballarpur municipal council

आप ‘AAP’ च्या प्रमुख मागण्यांमध्ये डॉ. झाकीर हुसेन वॉर्डमधील नुरी मशिदीसमोरील रोड तातडीने बनवावे, तसेच मक्का मशीद रोडवरील शहीद अब्दुल हमीद चौक ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक दरम्यानच्या खुल्या नाली भूमिगत करून पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांचा समावेश आहे. यासोबतच, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या समस्यांसाठी ‘AAP’ ने परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली, ज्यात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. नागरिकांनी आपला तीव्र संताप शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्या सोशल मीडिया हँडलवर व्यक्त केल्याचे दिसून आले. Aam Aadmi Party’s Elgar

शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “जर नुरी मशिदीसमोरील रस्त्याच्या कामाचे नियोजन पुढील १५ दिवसांत झाले नाही, तर परिसरातील नागरिकांसोबत आम आदमी पार्टी अधिक तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल असे आव्हान दिले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular