चंद्रपूर :- घरगुती वापरासाठी ग्राहकांना वितरित करण्यात येणाऱ्या LPG Gas एलपीजी गॅस सिलेंडरमधून गॅस काढून त्याची चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केला आहे. राईकवार यांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर तसेच गॅस काढण्यासाठी वापरले जात असल्याचे साहित्य दिसून येत आहे. Stealing gas from cylinders in Chandrapur
धारिवाल इन्फ्राचा “अरण्यगर्भ”, 18 हजार वृक्षांची लागवड…..
मयुर राईकवार यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या सिलेंडरमधील गॅस ठरावीक पद्धतीने काढून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय आहे. यासाठी सिलेंडरच्या व्हॉल्व्हशी संबंधित भागात छेडछाड करून गॅस मधील साधारण 2 ते 3 किलो गॅस काढली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि प्रशासनासह वृंदावन नगर येथील एका खाजगी गॅस एजंसी गोडाऊन येथे जात घरगुती गॅस सिलेंडर मधील 2 ते 3 किलो गॅस काढून दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरून दिवसाचे 10 ते 15 हजार रुपयांचे उलाढाल करत असल्याचा मोठा भांडाफोड केला आहे.
याआधीही आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी गॅस सिलिंडर बाबत चा भ्रष्टाचार जनतेच्या उघडकीस आणला होता
त्यामुळे सिलेंडर वितरण व्यवस्थेतच गॅस चोरी होत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. ग्राहकांना पूर्ण वजनाचा सिलेंडर मिळतो की त्यातील काही गॅस आधीच काढून घेतला जातो, याची तपासणी करण्याची मागणीही या प्रकरणामुळे पुढे येत आहे.
गॅस सिलेंडरमधून गॅस काढण्याचा प्रकार खरोखरच सुरू आहे का, सिलेंडरमध्ये छेडछाड झाली आहे का आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची पुरवठा विभाग तसेच संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या हक्काशी संबंधित या गंभीर आरोपाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
