Saturday, April 18, 2026
HomeMaharashtraबाबूपेठमध्ये भीम जयंतीचा जल्लोष

बाबूपेठमध्ये भीम जयंतीचा जल्लोष

Bhim Jayanti Celebrations in Babupeth; A Unique Initiative by Social Activist Sanjay Meshram

चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त Dr Babasaheb Ambedkar शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच १३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजता विविध सामाजिक संघटना, बौद्ध विहार आणि युवक मंडळांच्या वतीने मोठ्या धूमधडाक्यात केक कापून भीम जयंतीची सुरुवात करण्यात आली. Bhim Jayanti Celebrations in Babupeth with Unique Initiative

शहरातील बाबूपेठ परिसरातही जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक संघटना व मंडळांनी एकत्र येत मध्यरात्री केक कापून ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मेश्राम यांनी आपल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

संजय मेश्राम यांनी बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ मध्यरात्री १२ वाजता स्वखर्चाने तब्बल १४ केक कापून भीम जयंतीची सुरुवात केली. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी वर्गणी गोळा करून कार्यक्रम आयोजित केले जात असताना मेश्राम यांनी स्वतःच्या खर्चातून हा उपक्रम राबवला.

केक कापल्यानंतर उपस्थित सर्व बौद्ध अनुयायांना व नागरिकांना केकचे वितरण करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर भारावून टाकला. सामाजिक एकोप्याचा आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.

संजय मेश्राम यांच्या या उपक्रमाची बाबूपेठ परिसरात सर्वत्र प्रशंसा होत असून, त्यांच्या कार्याची नागरिकांकडून दखल घेतली जात आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे भीम जयंतीच्या उत्सवाला अधिकच अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular