*गोंडवाना विद्यापीठाचे आचार्य(Ph. D.)पदवी प्रधान करण्याची अधिसूचना निघणार आता तोंडी परीक्षेच्या (Viva -voce )दिवशीचं मिळणार*
*सिनेट सदस्य, युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नला यश*
चंद्रपूर :- आचार्य Ph. D. अवॉर्ड झाल्याचे Notification संशोधक विद्यार्थ्याला Viva-Voce च्या दिवशी प्रकाशित करण्याबाबत चा ठराव मागील अधिसभे मध्ये मांडला गेला होता. तो सभागृहात मान्य करण्यात आला असून Ph. D. धारक विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नौकर भरती साठी त्याना पात्र होण्याकरिता चा मार्ग मोकळा झाला आहे.
गडचिरोली विद्यापीठामध्ये Ph. D. Viva- voce झाल्यावर अंदाजे 15 दिवसानंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर Ph. D. Notification प्रकाशित होत असे या एक महिन्याच्या कालावधी मध्ये जर कुठे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नौकर भरती ची जाहिरात निघाली तर सदर संशोधन विद्यार्थी हा या पदासाठी पात्र ठरू शकत नहते व त्याला या नौकर भरती पासून वंचित राहायची वेळ विद्यार्थी वर येत होती . त्यामुळे गोंडवाना सिनेट सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी सहकारी सिनेट सदस्य डॉ.प्रवीणजी जोगी यांच्या मार्गदर्शनात मागील गोंडवाना विद्यापीठ अधिसभा बैठकीमध्ये ही प्रक्रिया गतिमान करून संशोधन करणाऱ्या विदयार्थ्याना दिलासा दयावा याकरिता Ph. D. Viva- voce आटपून बाकी कार्यालईल प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी Ph. D. Notification प्रकाशित केले तर सदर विद्यार्थी दुसऱ्याच दिवशीपासून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरेलं हे निर्देशनात आणून दिलें लगेच वरील बाबींचा पूर्ण विचार करून सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. याबद्दल संशोधन करणारे (Ph. D) करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक वर्गानी या करिता सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे तसेच डॉ.प्रवीणजी जोगी यांचे मनापासून अभिनंदन करीत सहकार्यासाठी आभार मानले.
