Water release from Irai Dam begins
चंद्रपूर :- इरई धरणाची पातळी आज २०७.३२५ मीटर वर पोहोचली आहे. त्यामुळे आज सकाळी ०७:३० वाजता धरणाचे ३ दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटर ने उघडण्यात आले. या निर्णयामुळे इरई नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून, खालच्या प्रवाहातील गावांमध्ये पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Water release from Irai Dam begins जटपूरा गेट जवळील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला
या पाणी विसर्गाचा फटका पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर नदीकाठच्या गावांना बसू शकतो. Riverside villages urged to be vigilant
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सूचना
-
नदीकाठच्या भागात जाणे टाळावे.
-
शेतकरी व पशुपालकांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत.
-
पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.



