Wednesday, August 19, 2026
HomeMaharashtraनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम

चंद्रपूर :- “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा!” या क्रांतिकारी घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देणारे, अदम्य राष्ट्रभक्ती, शौर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेले आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचे स्मरण करून त्यांना कृतज्ञ मानवंदना वाहण्यात आली. यावेळी नेताजींचे “जय हिंद” हे घोषवाक्य, स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचे धैर्य, त्याग आणि राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणादायी वृत्ती यांना उजाळा देण्यात आला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची पर्वा न करता संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची प्रखर जाज्वल्य भावना निर्माण केली. त्यांचे विचार, राष्ट्रभक्ती आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक आहे, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या अभिवादन कार्यक्रमास भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, उपाध्यक्ष बलराम डोडानी, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, नगरसेवक आशिष मासीरकर, अल्पसंख्यांक महिला अध्यक्षा कौसर खान, भाजयुमो महामंत्री सुमित बेले, विस्तारक प्रवीण गिलबिले यांच्यासह वंदना तिखे, सुरेश तालेवार, सत्यजित पोद्दार, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, अनिता झाडे, सरोज चांदेकर, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, छाया चवरे, लता ब्राह्मणे, सपना सातपुते, भावना बारसागडे, विश्वजित शहा, राकेश बोमनवार, देवेंद्र मोगरे, क्रिष्णा गाईन तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला मोर्चा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेताजींचा त्याग, शौर्य आणि “जय हिंद”चा राष्ट्रभक्तीचा मंत्र सदैव भारतीयांच्या हृदयात प्रेरणादायी राहील.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular