Tribute to a true activist who freed from alcohol addiction
चंद्रपूर :- दि.5 सप्टेंबर रोजी राजुरा विधानसभेचे माजी आमदार श्री सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमानिमित्त प.पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल डोंगरे तसेच संघटनेचे राजुरा विधानसभेत वास्तव्य करणारे चार प्रमुख श्री.लक्ष्मीकांत धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री दिगंबर वासेकर, जिल्हा संघटक श्री.प्रकाश अल्गमकर, जिल्हा सदक्ष श्री.गणपत चौधरी, तालुका अध्यक्ष गोंडपिपरी यांचा श्री सुदर्शनजी निमकर माजी.आमदार राजुरा विधानसभा यांच्या वतीने श्री.संजय धोटे माजी आमदार, देवराव दादा भोंगळे, माजी जी.प अध्यक्ष व मंचावर प्रमुख अतिथी गण यांच्या शुभहस्ते शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात संघटनेचा कार्य मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजाला दारू व्यसनमुक्त करण्या करिता धडपडत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अशाप्रकारे पुरस्काराचे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते या मानाचे मानकरी आहेत. या खऱ्या कर्तुत्वान कार्यकर्त्याच्या सत्कारमुळे व्यसनमुक्तीचे कार्य करण्याकरीता त्यांना बळ आणि ऊर्जा मिळत असते असे श्री अनिल डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.