Wednesday, June 3, 2026
HomeMLAयशोधन विहार म्हाडा येथे 'एक पेड मा के नाम' उपक्रम..

यशोधन विहार म्हाडा येथे ‘एक पेड मा के नाम’ उपक्रम..

Tree conservation is the need of the hour – MLA Devrao Bhongale

प्रमोद खिरटकर
कोरपणा तालुका प्रतिनिधी

कोरपना :- नांदाफाटा येथील यशोधन विहार म्हाडा कालनी येथे नुकतेच ‘ एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने घरी किमान एक झाड लावावे असे आवाहन यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे MLA Devrao Bhongale यांनी केले. Tree conservation is the need of the hour

यावेळी यशोधन विहार चे मुख्य च्या संचालक रवींद्रलाल श्रीवास्तव, पौर्णिमा श्रीवास्तव, गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, अरविंद डोहे, सतीश उपलेंचवार, ग्रीन लाइफ सोलर चे जनरल मॅनेजर विकास देशपांडे, अरुण रागीट, प्राचार्य अलेक्झांडरीना डीसूझा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

म्हाडा कॉलनी नागरिकांना “कमी दरात उत्तम अशी घर” निर्माण करून देत असून भविष्यात याचा गावातील तसेच परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे सोबतच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नेहमी वृक्षारोपण या ठिकाणी केली जात आहे. वृक्षारोपणा सोबतच वृक्षाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून त्याची काळजी ही घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी भोंगळे यांनी मांडले. ‘Ek Ped Ma Ke Naam’ initiative at Yashodhan Vihar Mhada

यावेळी विकास देशपांडे यांनी सोलर चे महत्व व विद्युत कपात कशाप्रकारे करता येईल याविषयीची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या आईच्या नावे वृक्ष लावून या मोहिमेची सुरुवात केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर चटप तर आभार सतीश जमदाडे यांनी मानले., यावेळी गावातील तसे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular