Terrible accident in Tukum, Chandrapur
चंद्रपूर :- हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सानिका कुमरे (वय २२ वर्षे, रा. लक्कडकोट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना तुकूम येथे घडली असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काजल आत्राम हिची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली. Terrible accident in Tukum Chandrapur
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हायवा चालक तुकूम परिसरातून जात असताना, चालकाला फिटचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर नागरिक जखमी झाले आहेत. यात नंदा उंबरकर (वय ५५, रा. मेजर गेट,) या किरकोड जखमी झाल्या आहेत. तसेच काजल आत्राम (रा. उपरवाही, ता. राजुरा) हिला जास्त इजा झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल आत्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. girl preparing for police recruitment loses her life
मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या ग्रामीण भागातून येऊन पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत होत्या, त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे.
 
                                    


