Teli community is united in the fight for political identity
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हयात बहुसंख्य असलेला तेली समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुदृढ असला तरी राजकीय पटलावर या समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे सुद्धा नाही. त्यामूळे समाजाची राजकीय प्रतिमा उंचावणे अगत्याचे झाले आहे. आता राजकीय अस्मितेच्या लढाईसाठी समाजाने सर्व शक्ति पणाला लावणे गरजेचे असल्याचा सुर रविवार 6 ऑक्टोबर ला झालेल्या समाजाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभेत उमटला.
चंद्रपूर जिल्हा विदर्भ तेली समाज महासंघाची महत्त्वाची सभा समाजाच्या विवीध प्रगतीचा आलेख मांडून गेली.
यावेळी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय शेंडे, केंद्रीय महासचिव डॉ. नामदेवराव हटवार, केंद्रीय मार्गदर्शक माजी आमदार देवराव भांडेकर, अॅड. विजय मोगरे, पांडुरंग आंबटकर, श्री. खनके सर यांचीही उपस्थीती होती. Brainstorming of senior officials on social and political issues
सभेत कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, त्यांचा परिचय, स्वागत व अभिनंदन केल्या नंतर तेली समाजाच्या विकासासाठी पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेले यांनी केलें.
पोटदुखे आणि भांडेकरां नंतर काय ?
तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा मागोवा घेताना स्व. शांताराम पोटदुखे आणि देवराव भांडेकर यांचा सन्माननीय अपवाद स्पष्ट आहे. मात्र त्यानंतर समाजाची शक्ति असूनही क्षमता असलेल्या व्यक्तीला राजकीय पाठबळ दिलें गेले नाही. उलट तेली समाजाच्या मतांचा वापर भाजप सह सर्वच पक्षांनी केला. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याची ही वेळ असल्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखविल्या.
डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी मिळावी
डॉ. विश्वास झाडे हे तेली समाजाचे वैद्यकीय भूषण असुन त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. त्यांची प्रतिमा उच्च कोटीची आणि स्वच्छ आहे. समाजात त्यांचें कार्य आणि स्थान सन्माननीय आहे. त्यांच्या अंगी नेतृत्व क्षमता सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जावी अश्या सामाजिक भावना सुद्धा या सभेत सामुहिकरीत्या व्यक्त झाल्या.