Sunday, March 23, 2025
HomeMaharashtraलोकसहभागातून यंदाचा श्री माता महाकाली महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार

लोकसहभागातून यंदाचा श्री माता महाकाली महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार

Shree Mata Mahakali Mahotsav will also be unprecedented due to the people’s participation – MLA Kishore Jorgewar

चंद्रपूर :- यंदा 7 ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची तयारी आपण सुरू केली असून महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. या महोत्सवात लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

7 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात सुरू होणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सव सिजन 3 च्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने माता भक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार जोरगेवार बोलत होते. Sri Mata Mahakali Festival Season 3

या बैठकीला श्री महाकाली माता ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल महाकाले, सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विस्वत श्याम धोपटे, मधुसुदन रुंगठा, वंदना हातगावकर, डाॅ. अशोक वासलवार, राजु शास्त्रकार, डाॅ. जयश्री कापसे – गावंडे, मनिषा पडगीलवार, शैलेंद्र शुक्ला, गोपाल मुंदडा, दादाजी नंदनवार, पुरुषोत्तम राउत, इतर मान्यवरांची प्रामुख्यतेने उपस्थिती होती.

श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरची ओळख बनला आहे. या महोत्सवामुळे चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव दरवर्षी नवनवे विक्रम करत असून यंदा राज्यस्थानी रथात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच, पाच दिवस धर्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. या पाच दिवसांत जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

दरम्यान, सदर महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांच्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता भक्तांनी दिलेल्या सूचना लक्षात घेण्यात आल्या. यातील आवश्यक सूचनांची दखल घेण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात 9,999 कन्यांचे कन्याभूजन व कन्याभोजन करण्यात येणार आहे.

तसेच नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात येणार आहे.

या भव्य आयोजनात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला माता भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular