Six vehicles inaugurated by the Guardian Minister
पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण
चंद्रपूर :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके Dr Ashok Uike यांच्या हस्ते करण्यात आले. Six vehicles inaugurated by the Guardian Minister
नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत.
ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.