Seriously injured T-126 tiger successfully captured in Tadoba Tiger Reserve
चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या Tadoba Tiger Reserve Forest (बफर) खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधून गंभीर जखमी अवस्थेतील वाघ T-126 (छोटा मटका) Chhota Matka याला दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. बचाव मोहिमेनंतर वाघाला आवश्यक वैद्यकीय तपासणी व उपचाराकरिता ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. Seriously injured T-126 tiger successfully captured in Tadoba Tiger Reserve
ही कारवाई वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. प्रभू नाथ शुक्ल व उपसंचालक (बफर) श्री. आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबाच्या शीघ्र कृती दलाने (RRT) पार पाडली. सहाय्यक वनसंरक्षक श्री. अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखालील या मोहिमेत वाघास कमीतकमी इजा होईल याची विशेष काळजी घेण्यात आली.
याआधी दिनांक १२ मे २०२५ रोजी खडसंगी बफर परिक्षेत्रातील निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र. ६३ मध्ये T-126 व T-158 या दोन वाघांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता.
राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीवरून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढत T-126 वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. यामागे उद्देश होता की जखमी वाघ मानव-वन्यजीव संघर्षाला कारणीभूत ठरू नये आणि अनुचित मनुष्यहानी टाळावी.