Scout Guide Workshop and Mahatma Jyotiba Phule Jayanti Celebration at Kamaladevi College of Education
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे स्काऊट गाईड कार्यशाळा व कांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आले. Scout Guide Workshop and Mahatma Jyotiba Phule Jayanti
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर व प्रमुख मार्गदर्शक मा. सौ. रोहीणी रा. मंगरूळकर (शिक्षिका) एफ.ई. एस. गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी बॅडन पॉवेल व कांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूष्प अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे यांनी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून केले.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शकांनी बी. एड. अभ्याक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षीय छात्राध्यापक व छात्राध्यापिकांना स्काऊट गाईड बद्दल योग्य मार्गदर्शन केले. तसेच स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास, तत्वे, वचन, नियम, उद्देश व खेळाविषयी माहिती दिली व प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे कांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. Kamaladevi College of Education

महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी अध्यक्षीय भाषणात असे सांगीतले की, कोणतेही कार्य करतांना सदैव तयार राहावे व स्काऊट गाईडच्या नियमाचे पालन करावे तसेच कांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.

