Saturday, January 17, 2026
HomeAcb Trapश्री. संत जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली राजुरा नगरी

श्री. संत जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली राजुरा नगरी

Saint Jaganade Maharaj’s birth anniversary is celebrated in Rajura

चंद्रपूर :- तेली समाज युवक मंडळ तालुका राजुरा द्वारा श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून यावेळी समाजाच्या वतीने राजुरा शहरातील राममंदिर, जुने बसस्थानक येथून ते श्री. संत जगनाडे महाराज सभागृह, रामपूर पर्यंत भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयघोषाने राजुरा नगरी दुमदुमली. यावेळी जयंती उत्सव, प्रतिमा पूजन, सत्कार आणि महाप्रसादाचे आयोजन संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह, सास्ती टी पॉईंट जवळ रामपूर, तहसील राजुरा येथे आयोजित करण्यात आले. Saint Jaganade Maharaj’s birth anniversary is celebrated in Rajura

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास गिरडकर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बेले, निवृत्त सुभेदार शंकर मेंगरे, सरपंच निळकंठ खेडेकर, ज्येष्ठ समाज बांधव बाबुराव लोखंडे, मोरेश्वर शेंडे, मधुकर गिरडकर, पंढरीनाथ चन्ने, कृष्णा खामनकर, गुणवंत शेंडे, रमेश बेले, सुरेश खामनकर, बंडू चन्ने, रामचंद्र घटे, चंद्रप्रकाश बुटले, पद्माकर बेलखेडे, नामदेव वाघे, ॲड. निनाद येरणे, डॉ. चंद्रकांत कुईटे, दिनकर रागीट, प्रमोद हजारे, दिलीप ईटणकर, शामराव चन्ने, राजेश्वर वैरागडे, विलास बुटले, गणेश बावणे, यासह जेष्ठ मार्गदर्शक शंकर बानकर, पांडुरंग चन्ने, शामराव खोब्रागडे, भगवान खनके आनंद हिवरे, सुधाकर बानकर, मधुकर बजाईत, मारुती ईटणकर, बाबुराव रागीट, श्रीमती कमलाबाई मंगरूळकर, श्रीमती पार्वताबाई कुईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाज बांधवांनी एकजुटीने तेली समाजाच्या आणि समाज बांधवांच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार केला. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीने समाजाला दिशा देण्याचे काम करावे. समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे, चंद्रप्रकाश बुटले यांनी केले, प्रास्ताविक प्रा. देविदास कुईटे यांनी तसेच तेली समाज युवक मंडळाचे अध्यक्ष श्री अनंता येरणे यांनी विस्तृत मनोगत व्यक्त केले,तर आभार प्रदर्शन प्रविण वैरागडे सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेली समाज युवक मंडळ राजुरा चे अध्यक्ष अनंता येरणे, उपाध्यक्ष प्रा. देविदास कुईटे, उपाध्यक्ष प्रवीण वैरागडे, सचिव जगदीश साठोने, सहसचिव बलवंत चन्ने, कोषाध्यक्ष किशोर रागीट, सदस्य प्रा. प्रफुल्ल शेंडे, स्वप्नील अवचट, विलास झाडे निखिल बजाईत, विनोद बानकर यासह ज्येष्ठ तेली समाज मंडळ, तेली समाज महिला मंडळ, तेली समाज कल्याण मंडळ वेकोली, संताजी महिला बचत गट, यमुना महिला बचत गट चे संपूर्ण कार्यकारिणी तथा राजुरा तालुक्यातील तेली समाज बंधू, भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

तेली समाजाच्या वतीने यांचे करण्यात आले सत्कार

या प्रसंगी तेली समाजाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल अध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात रामप्रसाद बुटले, पत्रकारिता क्षेत्रात आनंद चलाख ,तंबाखू मुक्त अभियान मनीष मंगरूळकर, शासकीय सेवेत नियुक्ती बद्दल श्वेता वासेकर, विकास खेडेकर, सुरज खनके, नवनियुक्त लोकप्रतिनिधी सरपंच निळकंठ खेडेकर, गुणवंत विद्यार्थी प्रणाली चन्ने, महेश वैरागडे, कोमल चन्ने, शशांक कुईटे, अनिश बुटले, रूपाली लोहबडे, आचल रागीट, अनिकेत डहाके, हर्षल आंबटकर, प्रारब्ध रागीट, अंबिका मंगरूळकर, नरेंद्र तपासे, तृप्ती येरणे, मंजिरी चन्ने, अथर्व वैरागडे, तनिकेत घिवे, सलोनी येरणे, अवंतिका ईटणकर, मृणाली वैरागडे, कस्तुरी चन्ने, वेदांती रागीट, सानवी वैरागडे, तर उत्कृष्ट चित्र श्रावणी बावणे, उत्कृष्ट रांगोळी चित्र व सजावट प्राची आंबटकर, पालखी शोभायात्रेत सहभागी राजुरा, कळमना, साखरवाही, टेंबुरवाई, सिंधी, गडचांदूर येथील भजन मंडळांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार.

तसेच वेशभूषा पार पाडणाऱ्या बालगोपालांमध्ये रुद्र बानकर, श्रावणी खोंड, चैतन्य रागीट, केतकी खेडेकर, यशदा लोंढे, दुर्गेश्वरी रागीट, युविका शेंडे, स्वरा भुरे, स्वरित भुरे, संजना कवलकर, निधी नरड, मेघांस खनके, ज्ञानदा वैरागडे, दक्ष खेडेकर, मयंक येरणे, रिया खोंड, कृष्णल कुईटे, माई रागीट, आलोक राजीव, देव्यानी गिरडकर, अनाया वैरागडे, मनस्वी वैरागडे, वंशिका कवलकर आदींचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular