Saturday, January 18, 2025
HomeHealthजिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक चिंचोळे यांना पदमुक्त करा.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक चिंचोळे यांना पदमुक्त करा.

Retired District Surgeon Chinchole from District General Hospital.
MNS’s demand to Health Ministry Upper Chief Secretary

चंद्रपूर :- जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे हे सेवानिवृत्त झाले आहे, मात्र वय वाढीबाबतचे कित्तेक अधिकाऱ्यांचे प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण येथे प्रलंबित असतांना व याबाबत शासन निर्णय नसताना त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत ठेऊन तत्कालीन आरोग्य सेवा संचालक नितीन अंबाडेकर यांनी घटनाबाह्य निर्णय दिला तो रद्द करण्यात यावा व जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांना सेवानिवृत्तीनंतर सुद्धा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार देऊन त्यांना भ्रष्टाचार करण्याची खुली सूट मिळतं असल्याने त्यांना पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी मनसेचे राजू कुकडे यांनी आरोग्य विभागाचे मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. Retired District Surgeon Chinchole from District General Hospital

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील घुडे, शहर अध्यक्ष पियुष धुपे व इतर मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

तत्कालीन नितीन अंबाडेकर संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी सेवानिवृती वय वाढीबाबतची न्यायालयीन प्रकरणे मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई येथे दाखल असल्याचे कारण समोर करून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती झाल्यानंतर मूळ पदावर राहण्याची मुद्दत वाढ दिली होती, ती नियमबाह्य असून ज्याअर्थी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई यांनी कुठलाही आदेश पारित केला नसताना व याबाबत शासन निर्णय नसताना एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांला जिथे अनेक आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी सेवानिवृत्ती झाल्यानंतर निर्णय घेण्याचा अधिकार बहाल करणे म्हणजे जुने अनेक प्रलंबित प्रकरणे व नवीन अनेक तडजोडीचे प्रकरणे यापासून आर्थिक लाभ घेण्याचा या अधिकाऱ्यांचा मनसूबा यशस्वी होणे आहे व हा निर्णय त्यामुळे योग्य आणि तर्कसंगत वाटतं नाही असेही मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले. MNS’s demand to Health Ministry Upper Chief Secretary

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे आरोग्य विभागात १५.०३. २०२३ रोजी रुजू झालेले डॉ महादेव चिंचोळे हे ३१.०५.२०२४ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक पदावरुन सेवानिवृत्ती झाले, पण तरीही डॉ. महादेव चिंचोळे हे डॉ नितीन अंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सक म्हणुन त्यांना वेतनच नाही तर मग जिल्हा शल्य चिकित्सक पदाचे त्यांना अधिकार कसे? हा मूळ प्रश्न असून “बिन पगारी फुल अधिकारी.” अशी अवस्था त्यांची आहे. मात्र असे असतांना त्यांना प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार बहाल असल्याने ते आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेऊन शासनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण जिल्हा शल्य चिकित्सक हे घटनात्मक पद असुन त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असते. आरोग्य बाबत अनेक विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्याची त्यांची जबाबदारी असते. वर्ग – ४ चे नियुक्ती प्राधीकरण असो की संस्था स्तरावर करोडो रुपयाची औषधे व इतर सामुग्री खरेदी करण्याचे अधिकार असो. एवढेच नाही तर वैद्यकीय प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार त्यांना असते. तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्रि व नवजात शिशु रुग्णालय हे सर्व संस्था त्यांच्या अधिपत्याखाली येतात त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला याबाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार बहाल करणे योग्य नाही, दरम्यान तत्कालीन आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी शासन निर्णय नसताना आणि मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण या न्यायालयाचा निर्णय झाला नसतांना आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून उपसंचालक श्रीमती डॉ. कांचन वानिरे यांना दिनांक ३०.०४.२०२४ रोजी पत्र दिले आणि जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. चिंचोळे यांना अधिकार बहाल केले ते नियमबाह्य असून याबाबत शंकेला वाव आहे, त्यामुळे नव्याने याबाबत निर्णय घेऊन चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांना पदमुक्त करावे किंव्हा त्यांना इतर आस्थापनेत स्थानंतरण करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत आंदोलन करेल असा इशारा सुद्धा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular