Friday, April 17, 2026
HomeAccidentमृत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत : रामनगर पोलिसांचे आवाहन

मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत : रामनगर पोलिसांचे आवाहन

Regarding the identification of the deceased: Ramnagar Police appeal

चंद्रपूर :- बस स्थानक परिसरात दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी एक वृद्ध इसम आजारी अवस्थेत झोपून असल्याने एजाज खान यांनी वृद्ध इसमाला ऑटोत टाकून चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान दिनांक १ मे २०२५ रोजी सदर अनोळखी वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Unknown Dead body

सदर अनोळखी इसमाचे वय अंदाजे ६५ ते ७० वर्ष असून उंची ५ फूट, वर्ण सावळा, बांधा बारीक आहे, लाल रंगाची टी शर्ट व आकाशी रंगाचा पँट परिधान केला असून दाढी पांढरी वाढलेली आहे. Ramnagar Police Station

सदर वर्णनावरून या मृत वृद्ध इसमाच्या नातलगांचा रामनगर पोलीस शोध घेत असून सदर व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन रामनगर, पोलीस नियंत्रण कक्ष तसेच तपास अधिकारी इंडल राठोड यांच्या मोबाईल क्रमांक ९५५२५१११५७ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular