Thursday, April 2, 2026
HomePoliticalप्रा. जोगेंद्र कवाडे यांना मंचावर बोलण्यास नाकारणे निंदनीय

प्रा. जोगेंद्र कवाडे यांना मंचावर बोलण्यास नाकारणे निंदनीय

Refusing to allow Professor Jogendra Kawade to speak on stage is condemnable – Anil Ramteke

प्रा. जोगेंद्र कवाडे यांना मंचावर बोलण्यास नाकारणे निंदनीय – अनिल रामटेके

चंद्रपूर :- नागपूर येथे बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना बोलावूनही त्यांना मंचावर बोलण्याची संधी न दिल्याने झालेला हा अपमान निंदनीय असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरीपा) चे शहराध्यक्ष अनिल रामटेके यांनी व्यक्त केले.

रामटेके म्हणाले की, “प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत ऐतिहासिक लाँग मार्चचे नेतृत्व करून विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवून दिले. खैरलांजी हत्याकांडानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे आंबेडकरी चळवळीतले योगदान अतुलनीय आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मंचावर काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात येते, परंतु आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक कवाडे यांना विरोध करणे ही कृती निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटनांनी समाजाच्या भावना दुखावल्या जातात.”

यावेळी रामटेके यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली की, “महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे आणि त्यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.”

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular