Congress holds sit-in protest and rally in Rajura to protest gas price hike
चंद्रपूर :- केंद्र व राज्य शासनाच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ आज राजुरा येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. Congress protest against gas price hike
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे हे आंदोलन पार पडले. यानंतर संविधान चौक ते तहसील कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी जोरदार नारेबाजी करीत शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविण्यात आले व समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली. गॅस दरवाढ व वाढत्या महागाईविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
या आंदोलनाच्या वेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शेतकरी व कामगार वर्गाचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे सामान्य जनतेसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर व राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी सांगितले की, शासनाने तात्काळ गॅस व इंधन दरवाढ मागे घ्यावी, कृत्रिम तुटवडा थांबवावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेस मार्फत जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते अँड. अरूण धोटे, काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, उपाध्यक्ष धनराज चिंचोलकर, न. प. सभापती अनंता ताजने, सभापती पूनम गिरसावडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक संध्या चांदेकर, जिल्हा महासचिव तथा नगरसेवक एजाज अहमद, संतोष इंदूरवार, अभिजीत धोटे, पंढरी चन्ने, नगरसेवक इंदुबाई निकोडे, निता बानकर, वज्रमाला बतकमवार, गोलू ठाकरे, ज्योतीताई शेंडे, सुमित्राबाई कुचनकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, छोटूलाल सोमलकर, शैलेश लोखंडे, प्रणय लांडे, कवडू सातपुते, देवानंद चुनारकर, सर्वानंद वाघमारे, वाटेकर सर, अशोक राव, सय्यद साबिर, संघपाल देठे, आकाश मावलीकर, निरंजन मंडल, चेतन जयपूर, निखील बजाईत, कुणाल माकोडे, काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी व कामगार आणि नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.