Prof. Prafulla Shende passed the SET exam in Marathi subject
चंद्रपूर :- गुरूदेव नगर वार्ड, धोपटाळा (ता. राजुरा) येथील रहिवासी प्रा. प्रफुल्ल राजेश्वर शेंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि. १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट (SET) मध्ये मराठी विषयात उत्तम यश मिळवत प्राध्यापक पदाकरिता पात्रता संपादन केली आहे. Prof. Prafulla Shende passed the SET exam
या परीक्षेत राज्यभरातून तब्बल ९० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत केवळ ६.६९ टक्के विद्यार्थीच पात्र ठरले असून, त्यामध्ये प्रा. शेंडे यांनी आपली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, याआधी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात त्यांनी राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. तब्बल दहा वर्षांनंतर दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी मराठी विषयात उल्लेखनीय यश संपादन करत पात्रता मिळवली. दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये गौरवाने घोषित झाले.
प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आपले शालेय शिक्षण मुल तालुक्यातील गडीसुर्ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये पूर्ण केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज, राजुरा येथे तर बी.ए. शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे पूर्ण केले. पुढे सन २००५ मध्ये त्यांनी एस.पी. काॅलेज, चंद्रपूर येथे मराठी विषयात एम.ए. तसेच जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे बी.एड. पूर्ण केले.
सन २००६ पासून ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक तसेच कार्यकारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. ते चार विषयात एम.ए. उत्तीर्ण असून, मागील १५ वर्षांपासून पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय आहेत.
आपल्या यशाचे श्रेय प्रा. शेंडे यांनी आजी-आजोबा स्व. सखुबाई बेले, स्व. जैराम बेले, स्व. कृष्णाजी शेंडे, स्व. गंगुबाई शेंडे, आई स्व. निर्मला राजेश्वर शेंडे, वडील श्री. राजेशराव कृष्णाजी शेंडे तसेच इतर नातेवाईक, पत्नी सौ. सुषमा प्रफुल्ल शेंडे, मुलगा प्रसून प्रफुल्ल शेंडे आणि सहकारी प्राध्यापकवर्ग यांच्या मार्गदर्शन व सहकार्याला दिले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता वर्तुळातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.