Premkumar Upare awarded Ph.D. degree — Study on the importance of agritourism for the economic empowerment of farmers
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी प्रेमकुमार अशोक उपरे यांना वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासन या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. Premkumar Upare awarded Ph.D. degree
उपरे यांनी आपले संशोधन कार्य डॉ. जी. एफ. सूर्या, प्राचार्य, रिनासंस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
“Impact of Agritourism on Economic Empowerment of Farmers: A Case Study on Farmers of Chandrapur District.” हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.
या प्रबंधामध्ये कृषी पर्यटन कसे शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणाला हातभार लावू शकते, त्यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान सुधारू शकते, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आधारित हे केस स्टडी भविष्यातील ग्रामीण विकास, शेतीपूरक व्यवसाय आणि शाश्वत रोजगार निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील या यशाबरोबरच प्रेमकुमार उपरे हे उपरे अॅग्रो इंटरप्रायजेस चे प्रोप्रायटर म्हणून यशस्वी उद्योजक आहेत. कृषीशी संबंधित उद्योगांमधून त्यांनी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले आहे.
उपरे यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कृषी क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापकवर्ग, व्यावसायिक जगत तसेच सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा अभ्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.