Andhra Pradesh Deputy Chief Minister Power Star Pawan Kalyan was welcomed by MLA Kishore Jorgewar at the airport
चंद्रपूर :- आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज, रविवारी चंद्रपूर पोहोचले. यावेळी मोरवा विमानतळावर आमदार किशोर जोरगेवार यांनी पवन कल्याण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. Power Star Pawan Kalyan was welcomed by MLA Kishore Jorgewar
पावर स्टार पवन कल्याण यांचा दुपारी ३.३० वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आगमन होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे चंद्रपूरात स्वागत केले.
दुपारी ३.३० वाजता पवन कल्याण यांच्या रोड शोला बागला चौकातून सुरुवात होणार असून, बागला चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे.