Wednesday, February 18, 2026
HomeElectionचंद्रपूर पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Police Administration has issued an appeal to the citizens

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी शहरात विविध राजकीय पक्षांतर्फे प्रचारासाठी मोटारसायकल रॅली, पायदळ रॅली व जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार कार्यक्रमांमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Chandrapur Municipal Corporation election

काँग्रेसच्या 7 नेत्यांची पक्षामधून हकालपट्टी

प्रचारासाठी निघणाऱ्या बाईक रॅलीचे मार्ग पुढीलप्रमाणे राहणार आहेत
बागला चौक – गांधी चौक, पठाणपुरा ते गांधी चौक, गांधी चौक – जटपुरा गेट, बिनबा गेट – श्री टॉकीज चौक, बंगाली कॅम्प चौक – सावरकर चौक.
तसेच दुर्गापूर डब्ल्यूसीएल ग्राउंड ते बंगाली कॅम्प, सीएचएल हॉस्पिटल ते गुरुद्वारा रोड, मातोश्री शाळा चौक, तुकूम मार्गे वरोरा नाका उड्डाणपूल, मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक, बिनबा गेट, मिलन चौक ते जोडदेऊळ (पठाणपुरा गेटपर्यंत) हे मार्ग रॅलीसाठी वापरले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामाशिवाय वरील नमूद मार्गांचा वापर टाळावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. विशेषतः रुग्णवाहिका, रुग्णालयात जाणारे नागरिक, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी रॅलीतील सहभागी व आयोजकांनी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Appeal of Chandrapur Police Administration

दरम्यान, बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हेल्मेटचा अनिवार्य वापर, तसेच सर्व वैध कागदपत्रे असलेली वाहनेच वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रॅलीदरम्यान वाहतूक नियमांचे पालन करणे, अनुचित प्रकार टाळणे आणि पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक प्रचार शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular