Stolen motorcycle recovered in just a few hours
चंद्रपूर :- दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री भद्रावती येथील टाईप नं. ०१, सेक्टर ४ येथून संदिप नामदेवराव मेश्राम यांची हिरो फॅशन सिल्वर रंगाची मोटारसायकल (क्र. MH-34 AN-3425) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या घटनेची फिर्याद मेश्राम यांनी पोलीस स्टेशन भद्रावती येथे दाखल केली होती. Stolen motorcycle recovered in just a few hours
पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५६२/२०२५ कलम ३७९ भा.दं.सं. नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीसांच्या गुप्त माहितीदाराच्या मदतीने अवघ्या अल्पावधीत आरोपीचा शोध घेण्यात यश आले. performance by Bhadravati police
भद्रावती पोलिसांनी आरोपी यमला तंगराज कोरवन (वय ३५, रा. शाम नगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली हिरो फॅशन मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, तिची किंमत सुमारे ₹६०,००० इतकी आहे. चंद्रपूर कॅन्सर रुग्णालयाला स्व. रतन टाटा यांचे नाव द्या
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाकल, व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी (भद्रावती) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, रोहित चिटगिरे, योगेश घाटोळे, खुशाल कावळे व संतोष राठोड यांनी केली.