Organizing an apprenticeship recruitment meet
यवतमाळ :- बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे शिकाऊ उमेदवार मेळाव्याचे आयोजन दि. 12 जून रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे.
या भरती मेळाव्याकरीता बजात ॲटो लिमिटेड Bajaj Auto Limited ही कंपनी उपस्थित राहणार आहे. ही कंपनी वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत आहे. बजाज ऑटो लिमिटेड भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तिनचाकी वाहने विकते. बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
या आस्थापनेला एमएमव्ही, पेन्टर जनरल, फिटर, मशिनिष्ट, टर्नर, डिझल मेकॅनिक, ईलेक्ट्रिशियन, ईलेक्ट्रॅानिक्स मेकॅनिक, कोपा, वायरमन या व्यवसायाचे उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी पात्र आहे. मुलाखतीला पात्र होण्यासाठी दहावीत किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या कंपनीमध्ये दरमहा 15 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. Organizing an apprenticeship recruitment meet
प्रशिक्षणार्थ्यांनी मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह मेळाव्यास उपस्थित राहावे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नागोरे व सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार रा.पी कोडापे यांनी केले आहे.
