Wednesday, October 7, 2026
HomeAccidentउत्सवात वीज सुरक्षेची काळजी घ्या; अधिकृत जोडणीच घ्या

उत्सवात वीज सुरक्षेची काळजी घ्या; अधिकृत जोडणीच घ्या

चंद्रपूर/गडचिरोली :- नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घ्यावी, तसेच उत्सवासाठी आवश्यक वीजपुरवठा अधिकृत वीज कंत्राटदारामार्फतच करून घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. opt only for authorized electricity connections

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 25 वर्ष, विकसित भारत सेवा संकल्प……

नवरात्रोत्सवातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा, महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित रोषणाई, भोजनदान व अन्य कार्यक्रमांसाठी वीज व्यवस्था करताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित भागातील महावितरण अभियंता व जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत, असेही महावितरणने स्पष्ट केले. Prioritize electrical safety during the festivities

ट्रकभर कॉपर बाहेर गेला कसा……

विद्युत तारांपासून अंतर आवश्यक

उत्सव व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. त्यामुळे रोषणाई, मिरवणूक व देखाव्यांचा विद्युत तारा किंवा खांबांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. गरबा, जागर आदी कार्यक्रम विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर आयोजित करावेत. MSEDCL

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे 10 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा……..

वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रलची व्यवस्था करावी. जवळच्या वीजखांबावरून अथवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये. वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी तार किंवा केबल विद्युत भार पेलण्यास सक्षम असल्याची खात्री करावी. तुटलेल्या किंवा लूज तारा वापरू नयेत; आवश्यक असल्यास प्रमाणित इन्सुलेशन टेपचा वापर करावा.

उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांनी महावितरणच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular