चंद्रपूर :- देशाच्या विकासासाठी, गरीब व वंचित घटकांच्या कल्याणासाठी, शेतकरी हितासाठी तसेच देशाची सुरक्षा आणि प्रतिष्ठा अधिक बळकट करण्यासाठी गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या विविध विकासकामांची आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पाहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा-सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर येथील तुकूम परिसरातील महेश भवन येथे दि. 07 ऑक्टोंबर 2026 रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील 25 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत देशाच्या विकासासोबतच गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकण्यात आला. देशाची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर वाढविणे, राष्ट्रीय सुरक्षा अधिक सक्षम करणे तसेच देशभक्ती आणि समाजसेवेच्या भावनेला प्रोत्साहन देणे या विशषयांवर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर नितीन नबीन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे प्रसारण उपस्थितांना दाखविण्यात आले. त्यांच्या संबोधनातून देशाच्या विकासाचा संकल्प, जनकल्याणकारी योजनांची दिशा आणि विकसित भारताच्या उद्दिष्ठावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी विकसित भारत संकल्प सभेचे प्रमुख वक्ते तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या 25 वर्षाच्या विकासाभिमुख कार्यकाळाची माहिती दिली. देशाच्या विकास प्रक्रीयेत सामान्य नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून, विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांना प्राधान्य देतानाच शेतकरी, गरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात आल्याचा उल्लेख अहीर यांनी केला. ‘सेवा हिच संघटनेची आणि सार्वजनिक जीवनाची मूलभूत भावना’ असून, समाजसेवा व राष्ट्रसेवेच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही उपस्थितांना संबोधित केले. चंद्रपूरसह देशाच्या विकासात नागरिकांचा सहभाग आणि जनजागृती महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. अशोक जिवतोडे, खुशाल बोंडे, प्रकाश देवतळे, सुभाष कासनगोट्टुवार, बलराम डोडाणी, दामोदर मंत्री, तुशार सोम, अनिल फुलझेले, रघुवीर अहीर, मोहन चैधरी, प्रमोद शास्त्रकार, श्रीकांत भोयर, अजय जयस्वाल, राजु घरोटे, रवी गुरूनुले, मनोज पाल, सविता दंडारे, वंदनाताई हातगांवकर, प्रा. रवी जोगी, सुभाश आदमने, सतिश तायडे, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, विनोद शेरकी, मयुर हेपट, दिवाकर पुद्दटवार, नकुल आचार्य, राजु येले, गौतम यादव, देवानंद वाढई, सुमित बेले, राकेश बोमनवार, चंद्रशेखर देशमुख, शितल गुरनुले, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, आशा देशमुख, अॅड. सारीका संदूरकर, ज्योती जिवने, निलीमा वनकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकसित भारत या संकल्पनेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी आणि सेवा, राष्ट्रभक्ती व समाजहिताच्या कार्याला अधिक व्यापक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
