Friday, April 3, 2026
HomeEducationalस्वातंत्र्य दिनानिमित्त मदरसात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनानिमित्त मदरसात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

Notebook and pen distribution program in Madrasa on the occasion of Independence Day

चंद्रपूर :- स्वातंत्र्य दिनानिमित्त महाकाली कॉलरी दीदार नगर येथील चिश्तिया मदरशामध्ये माजी नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या महिला नेत्या नजमा शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाईचेही वाटप करण्यात आले. Educational literature distribution program at Madrasa on the occasion of Independence Day

अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त

मदरशाचे हाफिज तुफैल साहेब यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल नजमा शेख यांचे आभार मानले. तर नजमा शेख यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस यांच्या मार्फत मदरशातील विद्यार्थ्यांना संगणकासह इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. घरफोडी, मोटर सायकल चोरी… दोघांना अटक

यानंतर बॉम्बे प्लॉट इंदिरा नगर येथील मदरसा अस्सकाफतुल इस्लामिया येथेही नजमा शेख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप केले. या प्रसंगी रझिया पठाण, इमाम शराफत मौलाना, मीना मेश्राम, राज शेख, गंगा ताई, जिब्राईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मदरशाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व नवीन ऊर्जा संचारली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular