Grand opening of National Service Scheme Camp of F.E.S. Girls College at Borda
चंद्रपूर :- फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेजच्या युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी व महिला सन्मान, महिला सुरक्षा या संकल्पनेवर आधारित दिनांक 17 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे आयोजित युवतींचे राष्ट्रीय विशेष शिबिराचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. National Service Scheme Camp of F.E.S. Girls College
याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अँड. विजय मोगरे, उद्घाटक माननीय श्री. सुमित जोशी, न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर, संस्थेचे सचिव अँड. पुरुषोत्तम सातपुते ,माननीय डॉ. संजय बेले, महाविद्यालय विकास समिती सदस्य तथा उपप्राचार्य डॉ .आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर, माननीय श्री. प्रशांत काटकर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा, माननीय श्री. प्रमोद डोर्लीकर, अध्यक्ष शाळा समिती, माननीय श्री. आत्माराम तावाडे, माजी पोलीस पाटील बोर्डा, माननीय श्रीकांत आदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेश चिमणकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे , सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातर्फे प्रा.अशोक बनसोड यांच्या मार्गदर्शनात संगीत विभागाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर केले तसेच कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक मा.श्री.सुमित जोशी यांना शाँल श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष मा.अँड. विजय मोगरे व संस्थेचे सचिव मा.अॅड.पुरूषोत्तम सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अँड. विजय मोगरे यांनी याप्रसंगी महिला सन्मान महिला सुरक्षा याविषयी शिबिराच्या माध्यमातून चिंतन तथा जनजागृती करावी असे विचार व्यक्त केले. उद्घाटक मा. श्री सुमित जोशी यांनी अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार व त्या संबंधित पोक्सो कायद्याविषयी विचार मांडले व उद्घाटन केल्याचे जाहीर केले.मा. अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती विषयक कार्याविषयी माहिती दिली.मा. प्रा. डाँ . संजय बेले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश व महत्त्व विशद केले. मा.श्री प्रशांत काटकर यांनी शिबिर यशस्वी करण्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी महिला विषयक सामाजिक ज्वलंत प्रश्नावर शिबिरार्थी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डाॅ.राजेश चिमनकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.राजेंद्र बारसागडे यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.मेघमाला मेश्राम यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील नागरिक,शिबिरार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



