Friday, February 7, 2025
HomeAcb Trapचंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण

चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण

New identity for 132 Government Industrial Organizations in Maharashtra

महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख*

*Ø चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण*

*Ø नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर*

मुंबई / चंद्रपूर :- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.

राज्यातील अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.

चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण : Government decision regarding approval of naming announced चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व. यशवंत बाजारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण, मुल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मा.सा. कन्नमवार, सिदेंवाही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस रामभाऊ बोंडाळे, गोंडपिपरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस नल-नील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस लाला लजपतराय, चंद्रपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस ऋषी अगस्त्य, नागभिड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आचार्य प्रफुल्लचंद्र रे, सावली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस क्रांतिकारी खुदीराम बोस, वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस गजानन पेंढारकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular