Friday, October 31, 2025
HomeAccidentविजेचा धोका टाळण्यास 'महावितरण' २४ तास सज्ज

विजेचा धोका टाळण्यास ‘महावितरण’ २४ तास सज्ज

MSEDCL ready to prevent power outages

चंद्रपूर / गडचिरोली :- पावसाळ्यात विजेचा धोका लक्षात घेता या काळात वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे असे आवाहन  ‘महावितरण’ कडून करण्यात आले आहे. नागरिकांना संपर्क करण्यासाठी २४ तास कंट्रोल रूमची व शाखा कार्यालयाची विशेष सेवा कार्यान्वित करण्यात आली  आहे. MSEDCL ready 24 hours to avoid power outages

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूने फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुपन, फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपांचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधी- कधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडत त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या व लोंबकळणाऱ्या वीजतारा पासून सावध राहावे. या  तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये तसेच रोहित्राचे (डी.पी.) झाकण उघडे असल्यास असा प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयास अवगत करावे असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात येत आहे. Contact ‘Control Room’ and branch offices 24 hours

चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या ‘महावितरण’ च्या चंद्रपूर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षातील- 7875761195,  रामनगर शाखा –7875107336, तुकुम शाखा -7875107722, एमआयडीसी शाखा – 7875107149, शास्त्रीनगर शाखा  – 7875110169, बाबूपेठ शाखा– 7875108563, बालाजी वॉर्ड शाखा – 7876761336, समाधी वॉर्ड शाखा – 7875110153, हॉस्पिटल शाखा -7066036230

गडचिरोली जिल्ह्यातील  सनियंत्रण कक्षातील ७८७५००९३३८,गडचिरोली शहर शाखा–7875761790, गडचिरोली ग्रामीण शाखा –7875761791, गडचिरोली कॉम्प्लेक्स शाखा- 7875761792 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे.

वादळवारा व पावसामुळे येणाऱ्या आपत्तीसाठीच या क्रमांकावर संपर्क करावा. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाइलद्वारे या क्रमांकावर वीज ग्राहकांना माहिती देता येणार या सोबतच ‘महावितरण’ ने वीज ग्राहकांसाठी १९१२/१९१२०/१८००२१२३४३५/१८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक दिलेआहेत. टोल फ्री क्रमांक विजबिलाच्या देयकावर नमूद केलेले आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular