MP Pratibha Dhanorkar announces support for former MLA Bachchu Kadu’s people’s movement
चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू Former MLA Bachhu Kadu यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी माजी आमदार बच्चू कडू यांना पाठवलेल्या पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
माजी आमदार बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग आणि समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. “आपण जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करत आला आहात. आपल्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,” असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. MP Pratibha Dhanorkar announces support for former MLA Bachchu Kadu’s people’s movement
माजी आमदार कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मागण्या जनसामान्यांच्या हिताच्या असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपला आणि आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. “जनप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडणे आणि ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण करत असलेले हे आंदोलन निश्चितच सकारात्मक परिणाम घडवेल अशी मला आशा आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी माजी  आमदार बच्चू कडू यांच्या या लढ्यात आपण खंबीरपणे त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.