चंद्रपूर :- गणेशोत्सवाच्या उत्साहाला भक्तीमय निरोप देत शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या. या मिरवणुकांमध्ये सहभागी गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने एलटीव्ही शाळेसमोर भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता. या स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध गणेश मंडळांचे उत्स्फूर्त स्वागत करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. MLA Kishore Jorgewar welcomed the rallies of Ganesh Mandals
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, कल्याणी किशोर जोरगेवार, माजी महानगर सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, महामंत्री रवींद्र गुरनुले, नामदेव डाहुले, सविता दंढारे, उपाध्यक्ष बलराम डोडानी, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, वंदना तिखे, मनपा गटनेता चंद्रशेखर शेट्टी, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष राशेद हुसेन, अध्यक्षा कौसर खान, बहुजन समाज आघाडी अध्यक्षा विमल काटकर, नगरसेवक आशिष मासिरकार, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, नगरसेविका सविता कांबळे, पुष्पा उराडे, शीतल गुरनुले, आशा देशमुख, सरला कुलसंगे, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, ज्येष्ठ नेते अरुण तिखे, महामंत्री राकेश नाकाडे, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार अक्कापेल्लीवार, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रलय मशाखेत्री, मंजुश्री कासनगोट्टूवार, पदाधिकारी सतीश तायडे, चंद्रराज बाथो, आकाश लडके, प्रिन्स प्रसाद, गौरव जोरगेवार, नकुल वासमवार, अमोल शेंडे, करण बैस, कार्तिक बोरेवार, चंद्रशेखर देशमुख, राकेश बोमनवार, दुर्गा वैरागडे, शांता धांडे, वंदना हजारे, सोनाली आंबेकर, वैशाली मेश्राम, सपना सातपुते, भावना बारसागडे, नीलिमा वनकर आदींची उपस्थिती होती.
गणेशोत्सव हा चंद्रपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दहा दिवस भक्तिभावाने गणरायाची आराधना केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचा उत्साह आणि नागरिकांचा जल्लोष पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विविध मंडळांच्या आकर्षक सजावटी, ढोल-ताशांचा गजर आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
एलटीव्ही शाळेसमोर उभारण्यात आलेल्या स्वागत मंचावर आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः उपस्थित राहून विविध गणेश मंडळांचे स्वागत केले. यावेळी गणेशमूर्तीचे दर्शन घेत त्यांनी गणरायाची आरती केली तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या गणेशोत्सवातील सहभागाचे कौतुक केले. गेल्या अनेक दिवसांपासून भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांना अखेरच्या दिवशी प्रेम आणि आपुलकीने निरोप देताना आमदार जोरगेवार यांचा सहभाग विशेष ठरला.
यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे पदाधिकारी, नगर सेवक कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत मंचावरून प्रत्येक गणेश मंडळाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणात मंडळांना निरोप देण्यात आला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ होतात. गणेश मंडळे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत असतात. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक योगदानाला प्रोत्साहन देणे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणार्या सकारात्मक वातावरणाला बळ देणे आवश्यक आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वागत मंचामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांच्या उत्साहात आणखी भर पडली. गणरायाच्या जयघोषात, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात विविध गणेश मंडळांना निरोप देत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.