Wednesday, November 5, 2025
HomeCrimeअल्पवयीन चोराचा गुन्हेगिरीचा पर्दाफाश : ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अल्पवयीन चोराचा गुन्हेगिरीचा पर्दाफाश : ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Minor thief’s criminal activities exposed

चंद्रपूर :- शहरातील बिनबा वार्ड परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा चंद्रपूर शहर पोलीसांनी अल्पावधीत केला आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी निता आकाश आत्राम (वय ३४, रा. नांदगाव पोडे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या आईच्या घरी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व ८ हजार रुपये रोख असा एकूण २६,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. Minor thief’s criminal activities exposed

फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपासदरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने या चोरीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे उघड झाले. बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १८,४०० रुपयांचे सोन्याचे दागिने व ३५,००० रुपयांची अॅक्टीव्हा मोपेड (MH-34-BS-2452) असा एकूण ५३,४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. Chandrapur City Police Station

यानंतर पुढील चौकशीत त्याने इतर गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपन्यांचे १७ अँड्रॉईड मोबाईल (किंमत १,७०,००० रुपये) आणि अॅपल कंपनीचा लॅपटॉप (किंमत १,००,००० रुपये) असा एकूण ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले व चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निक्षीकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात सपोनी राजेंद्र सोनवने, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रूपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, मपोअ दिपीका झिंगरे, सारीका गौरकार यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular